नवी दिल्ली : गेल्या महिन्यात, मे २०२२ मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये वार्षिक स्तरावर वाढ दिसून आली आहे. मात्र, मासिक आधारावर यात घट झाल्याचे आढळले आहे. मे महिन्यात जीएसटीचे कलेक्शन १,४०,८८५ कोटी रुपये झाले आहे. तर वार्षिक आधारात मे २०२१ मधील ९७,८२१ कोटी कोटींच्या तुलनेत या वेळी ४४ टक्के वाढ झाल्याचे दिसले आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मे महिन्यात झालेल्या एकूण १,४०,८८५ कोटी रुपयांच्या जीएसटीपैकी सीजीएसटी २५,०३६ कोटी रुपये आहे. तर एसजीएसटी ३२,००१ कोटी रुपये आहे. आयजीएसटी ७३,३४५ कोटी रुपये असून यामध्ये ३७,४६९ कोटी रुपये विविध वस्तूंच्या आयातीमधून आले आहेत. सेस १०,५०२ कोटी रुपये मिळाला असून ९३१ कोटी रुपये गुड्स इंपोर्ट झाला आहे. जीएसटी लागू झाल्यापासून चौथ्यांदा १.४० कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. मार्च २०२२ पासून सातत्याने जीएसटी कलेक्शन १.४० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मासिक आधारावर मात्र, जीएसटी कलेक्शनमध्ये १६ टक्क्यांची घट झाली आहे. एप्रिल महिन्यात १.६८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत मे महिन्यात १.४० लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही घट १६ टक्क्यांची आहे. सलग अकराव्या महिन्यात जीएसटी कलेक्शन १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. अर्थ मंत्रालयासाठी ही बाब खूप सकारात्मक आहे.












