पंजाबमध्ये शेतकऱ्यांना उर्वरित ऊस बिले मिळण्याची प्रतीक्षा

चंदीगढ  : पंजाबमध्ये एप्रिल महिन्यात गळीत हंगाम संपला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६६४.७३ कोटी रुपयांच्या थकबाकीची प्रतीक्षा आहे. राज्यातील १६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला होता.
हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, १६ कारखान्यांपैकी ७ खासगी आहेत. त्यांच्याकडे ३४३.४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सहकारी क्षेत्रातील नऊ साखर कारखान्यांचे व्यवस्थापन राज्य सरकारकडून केले जाते. त्यांचे शेतकऱ्यांकडे ३२१.३१ कोटी रुपये थकीत आहेत. गळीत हंगामात ६.४ कोटी क्विंटल उसाचे गाळप झाले असून ५९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात १.१० लाख हेक्टरमध्ये ऊस शेती करणयात आली होती.

राज्य सरकार एसएपीनुसार पैसे देते. उसाच्या पूर्वहंगामी प्रजातीचा दर ३६० रुपये प्रती क्विंटल तर आडसाली उसाचा दर (late maturing cane) ३५० रुपये प्रती क्विंटल आहे. खासगी कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या एसएपीमध्ये राज्य सरकार प्रती क्विंटल ३५ रुपयांचे योगदान देते. गेल्या तीन हंगामात शेतकऱ्यांना उसाचे पैसे न दिल्याबद्दल सरकारने वाहिद-संधार समुहाच्या मालकीच्या फगवाडा साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खासगी क्षेत्रातील इतर कारखान्यांच्या तुलनेत फगवाडा कारखान्याकडे गेल्या तीन हंगामातील शेतकऱ्यांचे ७६ कोटी रुपये थकीत आहेत.

कृषी विभागाने खासगी साखर कारखान्यांना बिले देण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here