लॉजिस्टिक क्षेत्राने मालवाहतुकीचे दर पारदर्शक करणे आवश्यक : मंत्री पिषूय गोयल

नवी दिल्ली : लॉजिस्टिक क्षेत्राने मालवाहतुकीच्या दरातील पारदर्शकतेबाबत काम करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी व्यक्त केले. यावेळी त्यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी ‘राष्ट्रीय लॉजिस्टिक उत्कृष्टता पुरस्कार’ या विषयावर बोलताना या क्षेत्रातील प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, लॉजिस्टिक क्षेत्राने पारदर्शक माल वाहतुकीच्या दरावर काम करण्याची गरज आहे. त्यांनी लॉजिस्टीक क्षेत्रातील माल वाहतुकीचे दर आणि बिलांतील अपारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आणला. यावर चिंता व्यक्त करताना गोयल यांनी यावर मत व्यक्त केले.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री गोयल म्हणाले की, माल वाहतकीच्या दरावर मी संतुष्ट नाही. याची घोषणा पारदर्शक रुपात करण्यात आलेली नाही. माल वाहतुकीच्या दरात अस्पष्टता आहे. त्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक त्रुटी आहेत. आम्ही अनेक बैठका घेतल्या आहेत. कोविडच्या कारणामुळे आम्ही उदार धोरण स्वीकारले होते. मला अपेक्षा आहे की, मला कठोर निर्णय घेण्याची गरज भासणार नाही. गोयल यांनी उद्योग आणि सरकारला लॉजिस्टिक क्षेत्रातील खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. जीडीपीच्या तुलनेत खर्च १३-१४ टक्के आहे. तर विकसित देशात हा खर्च ७-८ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here