मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सुरुवातीच्या सत्रामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १३ पैशांनी मजबूत होवून रुपया ७८.९० प्रती डॉलरवर खुला झाला. इँटरबँक फॉरेन करन्सी बाजारात रुपया ७८.९० च्या उच्च स्तरावर तर ७८.९४ च्या खालच्या स्तरावरही पोहोचला होता. गेल्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.०३ या स्तरावर बंद झाला होता. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, परदेशात डॉलरमध्ये आलेली मजबुती, विदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेण्याचा लावलेला सपाटा यामुळे रुपयाची घसरण सुरू आहे. रुपया या महिन्यात आतापर्यंत १.९७ टक्के घसरला आहे. तर या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ६.३९ टक्के घटला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.१३ टक्के तेजीने १०४.६४ वर पोहोचला. काल रुपाया उच्चांकी घसरणीनंतर इंटरबँक परकीय चलन विनिमय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मजबुतीने ७८.८६ वर खुला झाला. बाजाराच्या अखेरीस १८ पैशांनी घसरून ७९.०३ प्रती डॉवरच्या सर्वकालीन निच्चांकी स्तरावर बंद झाला होता. यादरम्यान अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया ७९.०५ च्या सर्वकालीन निच्चंकी स्तरावरही पोहोचला होता. याबाबत रिलायन्स सिक्युरिटीजचे सीनिअर रिसर्च ॲनालिस्ट श्रीराम अय्यर यांनी सांगितले जर रुपया आज ७८.६५ ते ७९.०५ प्रती डॉलर या दरम्यान राहील. आशिया आणि इतर देशांतील चलनाची स्थिती समान आहे. मात्र, रुपयावर दबाव राहील.












