नवी दिल्ली : सरकारने पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर सहा रुपये प्रती लिटर दराने कर लागू केला आहे. आणि डिझेलच्या निर्यातीवर १३ रुपये प्रती लिटर कर लावण्यात आला आहे. याबाबत एका स्वतंत्र सरकारी अधिसूचनेत म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या उच्च किमती असल्याने उत्पादकांना होणाऱ्या अप्रत्यक्ष लाभाऐवजी देशांतर्गत रुपात उत्पादित कच्च्या तेलावर २३,२३० रुपये प्रती टन अतिरिक्त कर आकारणी करण्यात येणार आहे.
याबाबत नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, निर्यातीवरील कर तेल रिफायनरी खासकरून खासगी क्षेत्राच्या आहेत. त्यांना युरोप, अमेरिका यांसारख्या बाजारांमध्ये इंधन निर्यातीबाबत खास लाभ दिला जातो. दुसरीकडे देशांतर्गत स्तरावर कच्च्या तेलाचे उत्पादन करण्यावर लागू करण्यात आलेला कर स्थानिक उत्पादकांसाठी आहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वधारलेल्या किमतीचा अप्रत्यक्ष लाभ मिळत आहे.












