नवी दिल्ली : रुपयात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. दररोज रुपया आपल्या निच्चांकी स्तरावर जात आहे. मात्र, १९ जुलैच्या सकाळी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८० चा टप्पाही ओलांडला. यापूर्वी सोमवारीही रुपया डॉलरच्या तुलनेत घसरुन ७९.९ वर बंद झाला होता. मात्र, मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ च्या स्तरावर आला. गेल्य आठवड्यात डॉलर इंडेक्स वाढून १०९.२ वर गेला होता. सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंतचा हा सर्वाधिक निर्देशांक आहे. या वर्षी डॉलररुपयांच्या तुलनेत आतापर्यंत ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. युरोपियन सेंट्रल बँकेच्यावतीने गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पहिली संधी आहे की, जेव्हा ११ वर्षानंतर पहिल्यांदाच व्याज दरात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत युरोत घसरण होऊ शकते.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डॉलर इंडेक्समधील नफेरोखीमुळे रुपयात घसरण सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. मात्र, यादरम्यान रुपयांमधील वाढ मर्यादित राहिली. देशांतर्गत शेअर बाजारात रिकव्हरीने रुपयांच्या निच्चांकी स्तरापासून थोडी सुधारणा झाली आहे. एक्सपर्ट्सच्या अपेक्षेनुसार या सप्ताहात रुपयात उतार-चढाव सुरू राहील. सप्ताहाच्या अखेरीस रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.५५ चा आकडे पार करेल. रुपया घसरल्याचा फायदा निर्यातीला झाला आहे.











