हॅम्बर्ग : जर्मनीतील साखर उद्योगातील संस्था डब्ल्यूव्हीजेडने आपल्या दुसऱ्या पीक पुर्वानुमानामध्ये नव्या हंगामात साखर उत्पादनात घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
डब्ल्यूव्हीजेडने आपल्या पिक पुर्वानुमानामध्ये म्हटले आहे की, नव्या २०२२-२३ या हंगामात जर्मानमध्ये बीटपासून प्रक्रिया केलेल्या साखरेचे उत्पादन गेल्या हंगामातील ४.५७ मिलियन टनापासून घटून ४.०५ मिलियन टन होईल अशी शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात जारी करण्यात आलेल्या ४.०७ मिलियन टन या पहिल्या पिक उत्पादन अंदाजापेक्षा हे उत्पादन थोडे कमी होईल असे सांगण्यात आले आहे.












