नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२२-२३ मध्ये पेट्रोलसोबत १२ टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आणि या उद्दिष्टाची प्रगती तपासण्यासाठी अन्न, सार्वजनिक वितरण आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन्ही मंत्रालये, इंधन वितरण कंपन्यांचे सचिव आणि भारतीय अन्न महामंडळाचे (FCI) अध्यक्षही उपस्थित होते.
बिझनेस वर्ल्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्र सरकारने ग्राहक वापराच्या पेट्रोलमध्ये जैव इंधन मिसळण्यासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) योजना सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्या आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेशा इथेनॉल पुरवठ्यासाठी पुढे येण्याबाबत खूप आश्वस्त आहेत. या बैठकीत २०२२-२३ मध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ती आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले.


