गेल्या हंगामात खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना संकटात टाकले होते. उत्तर प्रदेशात काही भागात दु्ष्काळ होता तर काही भागातील पाणी ओसरण्यासाठी अनेक दिवस लागले. त्याचा शेती आणि शेतकऱ्यांवर परिणाम झाला. त्यामुळे ऊस उत्पादनात घसरण होईल अशी शक्यता होती. मात्र, उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादन सर्वात आघाडीवर राहिले. यासाठी एका खास प्रजातीचे मोठे योगदान आहे. किड, रोगांचा फैलाव आणि खराब हवामानातही या प्रजातीच्या उत्पादनात घट झालेली नाही. ही खास प्रजाती CO-०२३८ असून गेल्या काही वर्षात यापासून उसाची उत्पादकता १.५ टक्के वाढली आहे. आणि CO-२०३८ प्रजातीमुळे साखर उताराही २ टक्क्यांनी वाढलाआहे. त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार २०१६-१७ मथध्ये युपीत साखर कारखान्यांनी सर्वाधिक साखर उत्पादन केले. आणि देशात पहिला क्रमांक मिळवला. याचे सर्व यश को ०२३८ या प्रजातीला जाते. या प्रजातीने शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत केली. याशिवाय साखर उताराही वाढला. त्यामुळे २०१९ मध्ये देशात साखर उत्पादनात २ टक्क्यांची घसरण झाली. तेव्हा युपीमध्ये साखर उत्पादन उच्चांकी १२६.३८ लाख टन झाले होते. पशूपालन आणि डेअरी राज्य मंत्री संजीव बालियान यांनीही साखर उत्पादनात या खास प्रजातीचे योगदान असल्याचे सांगितले. साखर उत्पादन सर्वोत्तम होण्यासाठी को – ०२३८ प्रजातीला पर्याय शोधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.















