प्राज इंडस्ट्रिज लिमिटेड आणि Axens या दोन्ही कंपन्यांमध्ये कमी कार्बन अल्कोहोलपासून अल्कोहोल-टू-जेट मार्गाद्वारे शाश्वत विमान इंधन (एसएएफ) निर्मितीसाठी भारतातील प्रकल्पांवर संयुक्तपणे काम करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. सद्यस्थितीत भारताचा जागतिक स्तरावरील टॉप पाच एव्हिएशन मार्केटमध्ये समावेश आहे. पुढील दोन दशकांमध्ये यामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. सद्यस्थितीत भारत सरकार विमान वाहतूक क्षेत्राला डीकार्बोनाइज करण्यासाठी एसएएफ आदेश लागू करण्यावर विचार करत आहे. या अनुषंगाने हा सामंजस्य करार कमी-कार्बन इथेनॉलचे एसएएफमध्ये रुपांतर करत भारताची गरज पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावेल.
प्राजने पूर्ण प्रकल्पासाठी एकत्रीकरण सेवा देताना मॉड्युलराइज्ड सोल्यूशन्स आणि पारंपारिक बायो-सोर्स फीडस्टॉकमधून कमी कार्बन आयसोब्यूटॅनॉल देताना इथेनॉलच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञानामध्ये सिद्ध केलेले कौशल्य वापरास सुरुवात केली आहे. Axens कंपनीकडून अल्कोहोल-टू-जेट तंत्रज्ञान वापरताना अल्कोहोलचे एसएएफमध्ये रुपांतर करण्यासाठी उपकरणे आणि सेवा यामध्ये प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. भारतात तसेच परदेशात प्राज तसेच Axens या दोन्ही बाजूंकडून सेल्युलोसिक बायोमासपासून कमी कार्बन इथेनॉल निर्मितीसाठी स्वतंत्रपणे तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान केले जाईल असे प्राजचे सीईओ आणि एमडी शिशिर जोशीपुरा म्हणाले. आम्ही बायोइकॉनॉमीद्वारे ऊर्जा संक्रमणाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. Axens सोबतची भागीदारी म्हणजे या संदर्भात आणखी एक पाऊल आहे, असे जोशीपुरा यांनी सांगितले. तर Axens चे एटीजे उत्पादनाचे उपाध्यक्ष झेवियर डीकूड म्हणाले की, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आम्ही एक तंत्रज्ञान प्रदाता म्हणून स्वच्छ इंधनाच्या भारताच्या प्रवासात सहभागी आहोत. आता प्राजसोबत एसएएफ प्रकल्पांवर काम सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत.














