नवी दिल्ली : CareEdge Ratings च्या रिपोर्टनुसार, भारतीय साखर कंपन्यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आपल्या महसुलात ८-१२ टक्के वाढ पाहायला मिळेल. यातून इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट आणि मूल्य वाढीसह क्षमतेमध्ये वाढही मिळू शकेल. साखर हंगाम २०२२-२३ मध्ये देशांतर्गत साखर उत्पादन ३४० लाख टन होईल असे अनुमान आहे, जे २०२१-२२ मधील ३५८ लाख टन उत्पादनापेक्षा थोडे कमी आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) म्हणण्यानुसार, ४५ लाख टन (एक वर्षाच्या तुलनेत ४१% अप) साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली जाईल.
केअर एज ॲडव्हायजरी अँड रिसर्चच्या संचालक तन्वी शाह यांनी सांगितले की, साखर उत्पादन आणि डिस्टिलरीसाठी स्थापित क्षमतेमध्ये वाढीसोबत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट आणि दरवाढीने साखर कारखान्यांना खूप फायदा होईल. ते म्हणाले की, साखर उद्योगाप्रती सरकारचे निरंतर समर्थन आणि भारतामध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉल उत्पादनाच्या वाढत्या उद्दिष्टाच्या दिशेने साखर क्षेत्र पुढे जात आहे. अहवालानुसार, या हंगामात साखर निर्यात कोटा ६० लाख टन निर्धारीत करण्यात आला आहे. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये हा कोटा अनुक्रमे ७२ लाख टन आणि ११२ लाख टन या झालेल्या निर्यातीपेक्षा कमी आहे. अतिरिक्त साखर निर्यात कोटा मागणी-पुरवठ्याच्या मुल्यांकनानंतर निश्चित केला जाईल.











