पंजाबमध्ये गव्हाची कापणी अखेरच्या टप्प्यात

भटिंडा : पंजाबमधील गव्हाची कापणी अखेरच्या टप्प्यात आहे. यासोबतच राज्यात पिकांचे अवशेष (पाचट) जाळण्याच्या १९ घटना घडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण प्रकरणे ८० पर्यंत पोहोचली आहेत. गेल्यावर्षीच्या, समान कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण फक्त १२.७ टक्के आहे.

पिकांचे अवशेष जाळण्याची प्रथा अवैध, प्रदूषण करणारी आहे. मात्र, ती शेतकऱ्यांना सहज-सोपी आणि फायदेशीर आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे शिल्लक अवशेष जाळतात. असे म्हटले जाते की, मार्च आणि एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसाने पिक कापणीस उशीर झाल्यामुळे या प्रकरणांत घट झाली आहे. पंजाब रिमोट सेन्सिंग सेंटरकडील माहितीनुसार, चालू हंगामात २४ एप्रिलपर्यंत पाचट जाळण्याच्या एकूण १९ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. तर २०२१ मध्ये ५६ तर २०२२ मध्ये २४ एप्रिलअखेर ३६० प्रकरणे नोंदविण्यात आली होती.

सोमवारपर्यंत दाखल झालेल्या १९ प्रकरणांपैकी भटिंडा आणि संगरुरमध्ये प्रत्येकी चार, बर्नालामध्ये तीन, मुक्तसर आणि लुधियानात प्रत्येकी दोन तर मालेरकोटला आणि फिरोजपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here