दोघट : खतौली साखर कारखाना दहा मे पर्यंत सुरू राहाणार आहे. साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक राजकुमार तोमर यांनी गुरुवारी चोगामा क्षेत्रातील ऊस खरेदी केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर गाळप स्थितीचा आढावाही त्यांनी घेतला.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे ऊस व्यवस्थापक तोमर म्हणाले की, आतापर्यंत २.३५ कोटी क्विंटल उसाचे गाळप आतापर्यंत करण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांना १६ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडून खरेदी करण्यात आलेल्या उसाचे पैसे जमा केले आहेत. ऊस खरेदी आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांना देणे हे प्राधान्य आहे. ऊस पिक तयार करताना शेतकऱ्यांनीही बियाण्यांसोबत औषधांचा वापर करावा. बिजप्रक्रीया केली तरच त्यावर रोगांचा फैलाव होणार नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे संपूर्ण गाळप व्हावे, यासाठी कारखाना १० मेपर्यंत सुरू राहिल, अशी माहिती तोमर यांनी दिली.












