लक्सर : लक्सर साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ३१ मार्चअखेर खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत, अशी माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अजय खंडेलवाल यांनी दिली. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर देण्यात सातत्य राखले आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी एक एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत खरेदी केलेल्या उसाचे एकूण ३८.९७ कोटी रुपयांचा धनादेश लक्सरसह इक्बालपूर, लिब्बरहेडी, ज्वालापूर या ऊस समित्यांना देण्यात आला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, लक्सर ऊस समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी पाठविण्यात आलेला धनादेश आधी समितीच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. धनादेशाचे पैसे खात्यामध्ये जमा होताच, ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील. शेतकऱ्यांना लवकरात लवकर उसाचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.












