पांडुरंग कारखान्यातर्फे 100 रुपयांप्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग

सोलापूर : कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातर्फे २०२२-२०२३ मध्ये गाळप केलेल्या उसाला प्रति टन १०० रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण १० कोटी रुपये जमा केल्याची माहिती चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले, कारखाना परंपरेप्रमाणे पहिल्या हप्त्यानंतरची उर्वरित रक्कम पोळा आणि दिवाळी सणाला अदा केली जाते. परंतु, यंदा अधिक महिना असल्याने पोळा सण एक महिना पुढे गेला आहे. शेतकऱ्यांना उसाची मशागत, लागण करण्यासाठी रक्कम उपलब्ध व्हावी, म्हणून प्रति टन १०० रुपयांप्रमाणे बिल अदा केली आहे. यापूर्वी कारखान्याने प्रति टन २४०० आणि आता १०० रुपये याप्रमाणे एकूण प्रति टन २५०० रुपये अदा करण्यात आले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here