सलग दुसऱ्या हंगामात रशियामध्ये गव्हाचे बंपर उत्पादन झाले. यामुळे हा देश जगातील सर्वात मोठा, म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला. एकीकडे रशिया मजबूत गहू निर्यातदार म्हणून देशाचे स्थान मजबूत करत आहे. दुसरीकडे युक्रेनच्या आक्रमणामुळे किमतींवर वाढलेला दबावही कमी करत आहे. याचा अर्थ पुरवठा वाढल्यामुळे देशात स्वस्त दरात गहू मिळत आहे.
बिझनेस स्टँडर्डमधील वृत्तानुसार, रशियाबरोबरच्या युद्धामुळे युक्रेनच्या बंदरांची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि सतत बॉम्बफेक सुरू आहे. त्यामुळे युक्रेनची अन्नधान्य निर्यात थांबली आहे. याच कारणामुळे रशियाला जागतिक गव्हाच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व मजबूत करण्यास मदत झाली आहे. या काळात रशियन शिपमेंटचे प्रमाण विक्रमी ठरले. कारण देशातील व्यापाऱ्यांनी आक्रमणानंतर आर्थिक आणि लॉजिस्टिकविषयक आव्हानांवर मात केली आहे, असे ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रशियाच्या धान्याने खचाखच भरलेल्या बंदरांनी महागड्या दराने गहू घेणाऱ्या ग्राहकांसाठी आशेचा किरणदेखील निर्माण केला आहे. कारण गव्हाच्या किमती सुमारे तीन वर्षांतील सर्वात कमी आहेत. रशिया सतत परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःची तिजोरी भरण्यासाठी गव्हाच्या किमती वाढवत आहे. परंतु रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हाच्या किमतीच्या निम्म्याहून कमी दराने शिकागोच्या बाजारात विक्री सुरू आहे.












