सोलापूर : म्हैसगाव (ता. माढा) येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक सभासदांना प्रत्येक शेअर्सच्या प्रमाणात साखरेचे मोफत वाटप करण्यात येत असल्याची माहिती विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन, आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. आ. शिंदे म्हणाले कि, २०२३ च्या दिवाळी सणाअगोदर नवीन शेअर्स घेणाऱ्या सर्व शेतकरी ऊस उत्पादक सभासदांनाही दिवाळीसाठी त्या शेअर्सच्या पटीत मोफत साखर मिळणार आहे. कारखान्याची गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही आ. शिंदे यांनी दिली.
यावेळी विठ्ठल कापरिशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव काशीद, चीफ इंजिनिअर मोहन पाटील, चीफ केमिस्ट प्रदीप केदार, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, डिस्टलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, परचेस अधिकारी कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर परमेश्वर माळी, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















