भारतीय शुगर्सतर्फे डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘बेस्ट एमडी’ पुरस्कार प्रदान

सोलापूर : देश पातळीवर साखर उद्योगामध्ये काम करणाऱ्या भारतीय शुगर या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथे नरेंद्र मोहन, भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, संग्रामसिंह शिंदे, एम. जी. जोशी यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे, दिनकरराव मोरे, वसंतनाना देशमुख व संचालक उपस्थित होते.

श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी स्वीकारला तेव्हापासून त्यांनी कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये व को-जन प्रकल्प, आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे. कारखान्याने अनेक पूरक उद्योग उभारले असून त्यामध्ये आसवनी यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रकल्पाचे विस्तारीकरण, ऑक्सिजन प्लांट उभारणी, माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जीवाणू खतनिर्मिती प्रकल्प, वाखरी येथील प्रशासकीय इमारत, सौरऊर्जा प्रकल्प इत्यादी प्रकल्प उभारले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here