विदर्भात ऊस विकासासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ‘व्हीएसआय’सोबत करार

अकोला : विदर्भातील काही जिल्ह्यांत ऊस पिकासाठी अनुकूल हवामान जमीन आणि सिंचनाची व्यवस्था असल्याने या पिकाच्या क्षेत्र वाढीसाठी ऊस पिकामध्ये अतिशय उत्कृष्ट अनुभव असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) च्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे. शिक्षण संशोधन तथा विस्तार कार्यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि व्हीएसआयमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनपर प्रयोग, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, पुण्यात व्हीएसआयच्या आधुनिक प्रयोगशाळेमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस पिकावर संशोधन करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, डॉ. आदिनाथ पसलावार, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. जे. पी. देशमुख, व्हीएसआयचे मुख्य संशोधक डॉ. अशोक कडलग, नीलेश खरोटे आणि सुनील मुंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here