बेगूसराय : बिहारमध्ये आगामी गाळप हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या ऊस विभागाने ऊस पीक नोंदणीचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. गडपुरा विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस पिक नोंदणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हसनपूर साखर कारखान्याच्या परिसरात ग्लोबल पोझिशन सिस्टीम (जीपीएस) द्वारे ४५ पथके हे काम करत आहेत.
या मोजणी व नोंदणी पडताळणीच्या आधारे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या स्लिप देण्यात आल्या आहेत. ऊस नोंदणी प्रत्येक शेतकऱ्याने करून घ्यावी. ऊस तोडणीवेळी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी उर्वरीत शेतकऱ्यांच्या नोंदणीचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांना शेतात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.











