कोल्हापूर, 23 मे 2018 : देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर उत्पादन पुणे विभागात आणि त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात होते. मात्र, साखरेच्या दर घसरणीचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांने सध्या 750 कोटी रुपयांच्या शॉर्ट मार्जिनमध्ये (अपुरा दुरावा)असल्याने कारखाने अडचणीत आले आहेत. याच कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांमधून जानेवारी अखेर 2018 पर्यंत सुमारे 60 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यात साखरेचे दर घसरल्याने प्रत्येक साखर कारखाना 30 ते 40 कोटी रुपयांपर्यंत शॉर्टमार्जिनमध्ये गेले आहेत. याचा फटका ऊस दर देण्यावर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी साखर हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांनी प्रतिटन उसाला 3500 रुपये दर मागितला होता. यावेळी प्रतिक्विंटल साखरेची किंमत 3500 ते 3600 रुपये होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतिटन उसाला 3000 रुपयांपर्यंत दर देणे शक्य झाले. प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होताच पंधरा ते वीस दिवसातच प्रतिक्विंटल साखरेचे दर सरासरी 500 रुपयाने घटले. त्यामुळे, बॅंकांकडून साखरेच्या किंमतीच्या तुलनेत होणारे मुल्यांकनही कमी झाले. दर कमी झाल्यानंतर बॅंकांनी प्रतिक्विंटल साखरेसाठी 3100 रुपये मुल्यांकन केले. यातून 85 टक्के म्हणजे 2600 रुपये प्रतिक्विंटल उचल मिळाली. यापैकी 750 रुपये प्रक्रिया खर्च, बॅंकेने दिलेल्या कर्जाच्य हप्ते, यामध्ये कारखान्यांच्या हातात 1880 रुपये ऊस दर देण्यासाठी रक्कम शिल्लक राहत आहेत. यामध्ये उसासाठी प्रतिटन 3000 रुपये देणे शक्य होत नाही. तर, एफआरपीनूसार ठरलेला दर तत्काळ द्यावा, यासाठी शासन नोटीस बजावत आहे. तर विविध संघटना कारखान्यांवर एफआरपी देण्याबाबत दबाव टाकत आहेत. दरम्यान, शासन घेत असलेल्या प्रति क्विंटल ३००० रुपये किमान दरामुळे दिलासा मिळणार आहे.
Recent Posts
भारत में चीनी उत्पादन अनुमान से कम होने की उम्मीद, वैश्विक बाजारों में कीमतों...
कोल्हापुर : किसानों और ट्रेडर्स ने रॉयटर्स को बताया कि, भारत में शुरू में लगाए गए अनुमान से चीनी उत्पादन कम हो सकता है,...
Daily Sugar Market Update By Vizzie – 18/02/2026
ChiniMandi, Mumbai: 18th Feb 2026
Domestic Market
Domestic prices traded steady to weak
Domestic sugar prices were reported steady to slightly weak in today’s session. Prices saw...
भारत शेतकऱ्यांच्या हिताशी कसलीही तडजोड करणार नाही : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारात शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार नाही. गहू, तांदूळ आणि मका...
Sugar season 2025–26: Farmers in Maharashtra await Rs 4,601 crore dues
Kolhapur: Sugar mills in Maharashtra have disbursed 86.34% of the total Fair and Remunerative Price (FRP) to farmers for the 2025–26 season, with Rs...
महाराष्ट्र: राज्य की 157 फैक्ट्रियों पर 4,601 करोड़ रुपये का FRP बकाया, 49 फैक्ट्रियों...
कोल्हापुर: राज्य में गन्ने की पेराई का सीजन अब अपने आखिरी दौर में पहुंच गया है और कुछ फैक्ट्रियां बंद हो गई हैं। शुगर...
कोल्हापूर : पंचगंगा कारखान्याच्या स्क्रॅप विक्री निविदेत पारदर्शकतेची सभासदांकडून मागणी
कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या भंगार विक्री निविदेत अटी व मजकूर यामध्ये गंभीर त्रुटी...
महाराष्ट्र : राज्यातील १५७ कारखान्यांकडे ४,६०१ कोटी रुपये एफआरपी थकीत, ४९ कारखान्यांकडून १०० टक्के...
कोल्हापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून काही कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. १५ मार्चअखेर गाळप हंगाम संपेल, असा अंदाज...
आर्थिक वर्ष २७ मध्ये भारतातील दुचाकी उद्योग ७-९ टक्क्याने वाढेल, विक्रीचे प्रमाण २.९ कोटी...
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२७ मध्ये भारतातील दुचाकी उद्योग ७-९ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, एकूण विक्रीचे प्रमाण सुमारे २.९ कोटी युनिट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता...
ઉપગ્રહોનો ઉપયોગ કરીને શેરડીની મીઠાશ માપવાથી લઈને ગાયો માટે સ્માર્ટ નેકલેસ… AI ખેડૂતો...
નવી દિલ્હી: કાશ્મીરમાં ગાયો માટે સ્માર્ટ ગળાનો હારથી લઈને 95 ટકા ચોકસાઈ સાથે શેરડીની મીઠાશની આગાહી કરવા સુધી, કૃત્રિમ બુદ્ધિ (AI) લાખો નાના ખેડૂતો...
પુણે: માલેગાંવ સહકારી ખાંડ ફેક્ટરીના ડિરેક્ટર તરીકે નાયબ મુખ્યમંત્રી સુનેત્રા પવારની બિનહરીફ પસંદગી
પુણે: માલેગાંવ સહકારી ખાંડ ફેક્ટરીના ડિરેક્ટર તરીકે નાયબ મુખ્યમંત્રી સુનેત્રા અજિત પવારની સર્વાનુમતે બિનહરીફ પસંદગી કરવામાં આવી. સ્વર્ગસ્થ નાયબ મુખ્યમંત્રી અજિત પવારના અચાનક અવસાનથી...














