मुझफ्फरनगर : पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना सेवरही संशोधन परिषदेच्या माध्यमातून शाहजहांपूर ऊस संशोधन संस्थेत आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मुझफ्फरनगर ऊस संशोधन परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. २ फेब्रुवारीपासून हे प्रशिक्षण सुरू आहे. आतापर्यंत १२८ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाले असून त्याद्वारे १० हजार ८२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशने गेल्या काही वर्षांत ऊस, इथेनॉल आणि साखर उत्पादनात मोठे यश मिळवले आहे. राज्य सरकार, ऊस विभागाने साखर कारखान्यांच्या सहकार्याने ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आणि पीक खर्च कमी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यातून साखर उद्योगाने भरीव प्रगती केल्याचे दिसून येत आहे.












