१५ नोव्हेंबर पासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर, ट्रक यांचा वापर करण्यात येतो. रात्रीच्या अंधारामध्ये वाहतुकीदरम्यान इतर वाहन चालकांना ट्रेलरचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने असे अपघात होऊ नये त्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा सप्ताह नॅचरल शुगरच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक बी बी ठोंबरे यांच्या हस्ते साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर टायर बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रेलर या वाहनांना रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपस्थित वाहन चालकांना नशापाणी न करता वाहन चालवणे, रस्ते अपघात रोखण्याच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी बाबत चेअरमन बी बी ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जनरल मॅनेजर उद्धव दिवेकर, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर, ऊस पुरवठा अधिकारी अरुण वाघमारे, सुरक्षा अधिकारी भारत भोरे, केन यार्ड सुपरवायझर सुनील गायकवाड तसेच ट्रॅक्टर चालक उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi नॅचरल शुगर कडून रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने रेडिअम रिफ्लेक्टर फलकाचे वाटप
Recent Posts
महाराष्ट्र : अतिवृष्टीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम उशिराने सुरु होण्याची शक्यता; मंत्रालयात मंगळवारच्या मंत्री...
पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गाळप हंगाम नेमका कधी सुरु होणार ? याकडे साखर उद्योगाच्या नजर लागल्या आहेत. सुरुवातीस 15 ऑक्टोंबरला हंगाम सुरु करण्याची...
एथेनॉल को बढ़ावा: उत्तम डिस्टिलरीज़ अपनी डिस्टिलरी क्षमता को 160 किलोलीटर प्रतिदिन तक बढ़ाएगी
उत्तम शुगर मिल्स लिमिटेड की सहायक कंपनी उत्तम डिस्टिलरीज़ लिमिटेड (यूडीएल) के निदेशक मंडल ने डिस्टिलरी क्षमता को 40 किलोलीटर प्रतिदिन से बढ़ाकर 160...
इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा...
सोलापूर : इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी अकलूज (जि. सोलापूर)...
पुणे : भीमा पाटस कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार -अध्यक्ष, आमदार कुल यांची माहिती
पुणे : भीमा पाटस साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. कारखान्याची ४३वी वार्षिक सभा शनिवारी पाटस येथे झाली. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल...
द एथेनॉल मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ इंडिया और द डिस्टिलर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र दोनों की...
सोलापुर : द एथेनॉल मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ इंडिया और द डिस्टिलर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र इन दोनों संगठनों की वार्षिक आम बैठक" रविवार, 28 सितंबर...
भारी बारिश से आपूर्ति बाधित: WISMA ने सरकार से सितंबर 2025 के लिए जारी...
नई दिल्ली : महाराष्ट्र, कर्नाटक और गुजरात में अत्यधिक बारिश के बीच, चीनी उद्योग ने सरकार से सितंबर 2025 के लिए चीनी जारी करने...
जीपीएस रिन्यूएबल्स ने एथेनॉल से SAF के व्यावसायिक पैमाने पर उत्पादन के लिए CSIR-NCL...
नवीकरणीय तेल और गैस समाधानों में एक प्रमुख वैश्विक कंपनी, जीपीएस रिन्यूएबल्स ने एथेनॉल से सतत विमानन ईंधन (SAF) के उत्पादन के लिए एक...