छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडने सव्वालाख टन ऊस गाळपाचा टप्पा गुरुवारी (ता.३०) पार केला. पंचगंगा शुगर अँड पॉवर कारखान्याची उभारणी वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणी होती. या कारखान्याची क्षमता ६५०० टन प्रतिदिन असून, इतर उपपदार्थांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे.
कारखान्याने गाळप केलेल्या उसास प्रति टन २८५० रुपये अॅडव्हान्स जाहीर केला आहे, जो दर अंतिम नाही. शेतकऱ्यांनी आपला ऊस पंचगंगा कारखान्यास देऊन सहकार्य करावे. नवीन लागवड केलेल्या उसाची तसेच खोडवा पिकाची नोंद कारखान्यास द्यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हमीपत्र मिळेल. ऊस तोडणी व वाहतुकीबाबत काही अडचण असल्यास कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले.


















