पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कारखान्याच्या निवडणूक रिंगणात असलेल्या पवार-जाचक पॅनेलमधून सुमारे ३५० उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यातील सुमारे ३२५ उमेदवारांच्या मुलाखती बारामतीमध्ये पार पडल्या. अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या. क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, पृथ्वीराज जाचक, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, किरण गुजर आदी उपस्थित होते. रखान्याचे पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी साखर संघाचे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू,” असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले.
यावेळी अजित पवार यांनी निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले. ते म्हणाले की, जागा कमी असल्यामुळे सर्वांनी संधी शक्य नाही. इतर निवडणुकीमध्ये संधी देवून सर्वांना समावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे विरोधक उसकावून देण्याचा प्रयत्न करतील. रुसवे फुगवे, नाराजी न दाखवता सर्वांनी कामाला लागावे. दरम्यान, कारखान्याचे पुढील पाच वर्षे पृथ्वीराज जाचक अध्यक्ष राहणार आहेत, तर पाच गटांमधील पाच संचालकांना प्रत्येकी एका वर्षाप्रमाणे उपाध्यक्ष होण्याची संधी देण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.


















