सांगली :आगामी गळीत हंगाम माजी मंत्री,आमदार जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित यशस्वी करू. ऊसतोडणी कामगारांचे काही प्रश्न असल्यास ते सोडविले जातील. उत्पादक, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी केले. साखराळे येथे राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या चारही युनिटच्या आगामी गळीत हंगामासाठीच्या तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष पाटील बोलत होते. यावेळी संचालक देवराज पाटील, विठ्ठल पाटील, बाळासाहेब पवार, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली उपस्थित होते.
यावेळी रामभाऊ माळी, महादेव माळी, अर्जुन कचरे, कुमार पाटील, शहाजी पाटील, सोनाजी सदगर, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संग्राम पाटील, गुणवंत पाटील, संभाजी कामेरकर, संदीप डांगे, सुभाष मस्कर, दीपक जगताप, वृषभनाथ पाटील यांच्यासोबत प्रातिनिधिक करार करण्यात आले. कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, गेल्या ६ वर्षांपासून साखर विक्रीचा दर वाढलेला नाही. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सध्या साखर उद्योगासमोर अनेक संकटे उभी आहेत. तरीही कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसबिले, तसेच तोडणी वाहतुकीची बिले दिली आहेत. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले.