कर्नाटक : इथेनॉल प्रकल्पामुळे दशकांपूर्वीचा पाटील-यतनाल राजकीय संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

बेंगळुरू: साखर मंत्री शिवानंद पाटील आणि भाजपमधून हकालपट्टी केलेले आमदार बसनगौडा पाटील- यतनाल यांच्यातील तीन दशकांपासून सुरू असलेले राजकीय वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. यतनाल यांनी निवडणूक लढविण्यासाठी दिलेल्या आव्हानानंतर मंत्री शिवानंद पाटील यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसल्यामुळे उत्तर कर्नाटकातील प्रभावशाली पंचमसाली लिंगायत गटाच्या नेतृत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पाटील-यतनाल वादाच्या ताज्या घडामोडींमध्ये मंत्री पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष यूटी खादर यांना सशर्त राजीनामा पत्र सादर केले. कारण यतनाल सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या विजयपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान मंत्री पाटील यांना दिले आहे.

या नव्याने सुरू झालेल्या संघर्षामुळे विजयपुर जिल्ह्यात वर्चस्व, सहकारी संस्थांवरील नियंत्रण आणि पंचमसाली लिंगायत समुदायाच्या नेतृत्वासाठी दीर्घकाळ चाललेल्या लढाईला पुन्हा उजाळा मिळाला आहे. पाटील यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकांवर बराच प्रभाव आहे, तर यतनाल हे सिद्धसिरी सौहार्द सहकारी लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. चिंचोली येथील सिद्धसिरी इथेनॉल आणि पॉवर (एसईपी) प्लांट नव्या संघर्षासाठी कारणीभूत ठरला आहे. यतनाल यांच्याच सहकारी बँकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या या प्लांटला दीर्घ कायदेशीर लढाईनंतर कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून प्रदूषण मंजुरी मिळाली. तथापि, राज्य सरकार ने खोड घातल्याने प्लांट सुरु होऊ शकला नसल्याचा आरोप यतनाल समर्थक करू लागले आहेत. तथापि, पाटील समर्थकांनी प्लांट सुरु करण्यासाठी योग्य, कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, असा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here