कोल्हापूर: हलकर्णी येथील अथर्व – दौलत साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गाळप हंगामाचा
प्रारंभ कारखाना कार्यस्थळी झाला. साखर उद्योगाला सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही यंदाच्या गाळप हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मनासिंग खोराटे यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय माने उपस्थित होते.
अध्यक्ष खोराटे म्हणाले की, अथर्व – दौलत साखर कारखाना जबाबदारीने चालवला जात आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे वेतन, तोडणी वाहतुकीची बिले वेळेवर दिली गेली आहेत. कारखान्याचे संचालक विजय पाटील यांनी, ऊस उत्पादन व वाहतूक व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. शेती अधिकारी युवराज पाटील यांनी ऊस लागवड तंत्र, आधुनिक पद्धती, तसेच ऊस विकास योजनांची माहिती दिली. विजय पाटील, संजय पाटील, विजय देसाई, सुभाष पाटील, रोहन पाटील, प्रवीण नाईक, विजय मुरकुटे, राजू पाटील आदींनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. अश्रू लाड यांनी आभार मानले.