…म्हणून मी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत घातले लक्ष : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना रणांगण सोडणे, हा पळपुटेपणा होईल. म्हणून या निवडणुकीत लक्ष घातले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पृथ्वीराज जाचक, किरण गुजर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले कि, छत्रपती साखर कारखाना अडचणीत असताना रणांगण सोडणे, हा पळपुटेपणा होईल. त्यामुळे या निवडणुकीत लक्ष घातले आहे.देशात सहकार विभाग मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार विभाग स्थापन केला. देशात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन ठिकाणी अन्य राज्यांपेक्षा सहकार क्षेत्र मजबूत आहे, असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले कि, विरोधक मोबाईलच्या माध्यमातून अफवा निर्माण करू शकतात. जुनी भाषणे दाखविण्याचा प्रयत्न करतील. यापूर्वी अनेकदा शिवसेनेच्या विरोधात भाषणे केली. शिवसेनेबरोबर जायचे असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम केले. शेवटी आपण वैयक्तिक स्वार्थासाठी समाजकारण, राजकारण करतो की समाजाच्या भल्यासाठी, हे महत्त्वाचे आहे.’ असे अजित पवार यांनी सागितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here