बेळगाव : संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयीन इमारतीचे नूतनीकरण, कामगार वसाहतीतील नळपाणी पुरवठा नूतनीकरणाच्या कामाची सुरुवात कारखान्याचे अध्यक्ष बसवराज कल्लटी यांच्या हस्ते केली. कल्लटी म्हणाले, ठेकेदारांनी काम गुणवत्तापूर्ण करण्यासह वेळेत पूर्ण करावे. त्यासाठी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी, संचालक शिवनायक नाईक, अप्पासाहेब शिरकोळी, मल्लिकार्जुन पाटील, बाबासाहेब आरबोळे, प्रभुदेव पाटील, बसाप्पा मरडी, सुरेंद्र दोडलिंगन्नावर, सुरेश रायमाने, शारदा पाटील, भारती हंजी, कार्यकारी संचालक वीरनगौडा पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.