भोपाळ: गेल्या वर्षी गहू खरेदीत ३३% घट झाल्यानंतर मध्य प्रदेश ने यंदा जोरदार पुनरागमन केले आहे. ५ मे पर्यंत एकूण ७६.१० लाख मेट्रिक टन (LMT) गहू खरेदी करून सुधारित लक्ष्यही ओलांडले आहे. केंद्र सरकारने पहिल्यांदा दिलेल्या ६० LMT च्या मूळ लक्ष्यापेक्षा आणि त्यानंतरच्या ७० LMT च्या सुधारित लक्ष्यापेक्षाही खूपच जास्त गहू खरेदी केली आहे, असे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. गेल्या वर्षी राज्यात फक्त ४८ LMT गहू खरेदी करण्यात यश आले होते. याउलट, यावर्षी गहू खरेदीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक गहू खरेदी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या मते, गहू किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) ₹२,६०० प्रति क्विंटलने खरेदी केला जात आहे, ज्यामध्ये राज्य सरकारकडून प्रति क्विंटल १७५ रुपयांचा बोनस समाविष्ट आहे.अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग वर्मा म्हणाले की, अचानक झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. आम्ही गव्हाच्या साठ्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत. बहुतेक खरेदी केंद्रे गोदामांमध्ये आहेत, त्यामुळे साठवणूक सुरक्षित आहे आणि नुकसान कमी झाले आहे.२०२२ मध्ये राज्यात फक्त ४.६ लाख मेट्रिक टन आणि २०२३ मध्ये ७.१ लाख मेट्रिक टन खरेदी झाली होती.