पुणे : छत्रपती साखर कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून झेडपी इलेक्शनची मोर्चेबांधणी !

पुणे : इंदापूर सध्या छत्रपती साखर कारखाना निवडणुकीची धामधूम सुरु असून दोन्ही गटाकडून आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून काही इच्छुकांनी झेडपी निवडणुकीसाठी ‘साखर’ पेरणी सुरु केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणाऱ्या चारच महिन्यात पार पडतील, असे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटातील नेहमीचेच कलाकार तयारीस लागलेले दिसून येत आहेत. छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा, ट्रेलर असणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

इंदापूर तालुक्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मजबूत पकड आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. माजी चेअरमन अविनाश घोलप यांच्या पॅनलला कसा प्रतिसाद मिळतो, यावर या भागातील दोन जिल्हा परिषद गटांमधील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठी राजकीय अडचण असताना देखील, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना बिनविरोध करत आपली सहकार क्षेत्राशी असलेली नाळ पुन्हा सिद्ध केलेली आहे. तालुक्यातील सात ही जिल्हा परिषद मतदार संघात कार्यकर्त्याचे टीमवर्क व जाळे मोठे आहे. आता ते कशी राजकीय खेळी खेळणार याकडे लक्ष लागले आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सामान्य जनतेची नाळ कसल्याही परिस्थितीत तुटू नये, यासाठी आठवड्यातील काही दिवस इंदापूर तालुक्यासाठी देत आहेत. अपक्ष विधानसभा लढवणारे प्रवीण माने हे भारतीय जनता पार्टी जाणार का? किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत आघाडी करणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. असे असले तरी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाचा इफेक्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here