छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील देणाऱ्या देवगिरी सहकारी साखर कारखान्यावर कल्याण चव्हाण नितीन देशमुख, योगेश मिसाळ या तिघांची अशासकीय सदस्य म्हणून प्रशासकीय मंडळात निवड करण्यात आली आहे. एका वर्षासाठी सदरील निवड साखर प्रादेशिक सहसंचालक एस. बी. रावल यांनी केली आहे. तर कारखान्याचा बॉयलर दसऱ्याच्या मुहूर्तावर पेटणार आहे. कारखाना कर्जमुक्त करून प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी दिली. यावेळी अतुल चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, भाजपचे कल्याण चव्हाण, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, माजी जि.प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, माजी उपसभापती राहुल डकले, चेअरमन पंडितराव जाधव, सूचित बोरसे, माजी सभापती जे.पी. शेजवळ, सर्जेराव मेटे, राजेंद्र डकले, बाबासाहेब तांदळे, शेख शकेर, विजय मोरे उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाल्या की, कारखाना कर्जमुक्त करणार असल्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. त्याच अनुषंगाने कारखाना कर्जमुक्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुनर्बांधणी करून कारखाना सुरू करणार आहे. तर अवयासयक श्रीराम सोने यांनी सांगितले की, कारखान्याची जमीन विकून आलेल्या १२४ कोटी ६५ लाखातून देणेदाराची देणी दिली. राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर पेटवून गळीत हंगाम सुरू करणार आहे.