मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र स्टेट कॉऑपरेटिव्ह बँक लि. आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ विषयावरील परिसंवाद बोलताना शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्रातील सगळ्या सहकारी साखर कारखान्यांची काय अवस्था झाली आहे…आधी 80 टक्के सहकारी आणि 20 टक्के खासगी कारखाने होते. पण, आता 50 टक्के खासगी कारखाने झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी एक कमिशन अपॉइंट करुन आणि या सहकारी संस्थाचा अभ्यास करावा. नेमक्या काय अडचणी आहेत, ते पाहावे,
पवार म्हणाले, दख्खनचा उठाव इथ जो संघर्ष झाला, त्यावेळी इंग्रजांना शेतकऱ्यांचे दुःख समजले आणि त्यांनी उपाय योजना केल्या. त्यावेळी सावकार आणि व्यापारी यांच्याकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते, मात्र ते बंद झाले आणि सहकारातून त्यांना कर्ज मिळू लागले. पूर्वी साखर कारखानदारी नव्हती गूळाचा धंदा होता. एक व्यापारी गूळ करायचा आणि त्याचा त्या मार्केटवर दबाव असायचा, मात्र हे बदलण्यात आले आणि त्यावर पर्याय म्हणून या राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात 50 टक्के सहकारी साखर कारखाने खासगी झाले आहेत. हे शरद पवारांनी सांगितले हे खरे आहे. साखर उद्योगात केवळ साखरेवर कारखाना चालू शकत नाही. आता त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय करावे लागणार आहे. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहिला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगीर भरती पाहायला मिळत आहे. सहकारातील महत्वाचा घटक म्हणजे सहकारी संस्था आहेत. आम्ही सेल्फ रीडेव्हलपमेंट ही योजना देखील राबवत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.