सागंली : राजारामबापू कारखान्यातर्फे समृद्ध भूमी अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

सांगली : “राजारामबापू कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रात पुरेसा व चांगल्या प्रतीचा ऊस उपलब्ध व्हावा, या उद्देशाने समृद्ध भूमी अभियानातून विविध विकास योजना राबविल्या आहेत. याचा ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याचे शेती कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले. येथे समृद्ध भूमी अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कारखाना संचालक अमरसिंह साळुंखे, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, संचालक वैभव रकटे, बाळासाहेब कोकाटे यांच्या उपस्थितीत झाला.

पाटील म्हणाले, अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्यामार्फत माती व पाणी परीक्षण, निरोगी ऊस रोपांची निर्मिती, सेंद्रिय खत, जैविक खत, द्रवरूप खते, ठिबक सिंचनासाठी अनुदान, क्षारपड जमीन सुधारणेसाठी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना, ड्रोनद्वारे फवारणी व मल्टिस्पेक्ट्रम ड्रोन कॅमेरा सुविधा आदी योजना राबविल्या जात आहेत. सभासद व ऊस उत्पादकांनी लाभ घेऊन चांगल्या प्रतीच्या उसाचे अधिक उत्पादन घ्यावे. ऊस विकास अधिकारी सुजल पाटील यांनी कार्बन क्रेडिट योजना, ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर याविषयी माहिती दिली. यावेळी अनिल शिंगारे, सतीश पाटील, संभाजी पाटील, लालासाहेब अनुसे, उपसरपंच जालिंदर यादव, बाळासाहेब देसाई, सारंग भोसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here