पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा यंदा, सन २०२५-२६चा गळीत हंगाम तब्बल १६७ दिवस सुरू राहिला. कारखान्याने ९,०३,७११ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९,९१,१०१ साखर पोती उत्पादित केली आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. शासनाच्या धोरणामुळे साखर कारखाने उशिरा सुरू झाले. तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे १ लाख ४६ हजार मेट्रिक टन ऊस बाहेरच्या कारखान्याला देण्यात आला. विस्तारीकरणामुळे ऊस तोडणी उशिरा झाली. पुढील वर्षी सर्व उसाचे गाळप वेळेवर होईल, असे यावेळी अध्यक्ष शेरकर म्हणाले.
शेरकर म्हणाले की, यंदाच्या वर्षी विघ्नहर कारखान्याची निवडणूक पार पडली. सभासदांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून कारखान्याची सत्ता एकहाती आमच्या हाती दिली. कारखान्यावर असलेले प्रेम व आमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील, अभियंता बाळासाहेब शिंदे यांच्यासह चीफ केमिस्ट, सर्व कर्मचारी व ऊस तोडणी मजूर या सर्वांच्या सहकार्यामुळे गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व उसाची तोडणीदेखील केली