ब्राझील : कर्ज कमी करण्यासाठी ‘रायझेन’ची साखर कारखाना विक्रीस सहमती

साओ पाउलो : कोसान एसए आणि शेल पीएलसी यांच्या सह-मालकीच्या ब्राझिलियन इथेनॉल उत्पादक आणि इंधन वितरक कंपनी रायझेन एसएने (Raizen SA) कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांच्या एका साखर कारखान्याची विक्री करण्यास सहमती दर्शविली आहे.

याबाबत रायझेनने एका फायलिंगमध्ये म्हटले आहे की, फेरारी अ‍ॅग्रोइंडस्ट्रिया एसए आणि अ‍ॅग्रोमेन सेमेंटेस अ‍ॅग्रीकोलास लिमिटेडए साओ पाउलो राज्यात असलेल्या कारखान्यासाठी एकूण ४२५ दशलक्ष रियास (७५ दशलक्ष डॉलर्स) देतील. हा करार अँटीट्रस्ट मंजुरीसाठी प्रलंबित आहे. यामुळे रायझेनवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here