पुणे : आडसाली उसाच्या उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक, शेतकरी परिसंवादात तज्ञांचा सल्ला

पुणे : आडसाली उसाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पीक न घेता योग्य व्यवस्थापन तसेच उपयोजन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऊस तज्ज्ञ डॉ. संदीप घोले यांनी केले. पारगाव (ता. दौंड) येथे सकाळ ॲग्रोवन व संदीप प्याज कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी घोले म्हणाले की, ऊस लागवड करताना माती परीक्षण, खत व्यवस्थापन, उच्च दर्जाचे बियाणे तसेच दोन सरींमध्ये साडेचार फुटाचे अंतर असावे. कंपोस्ट खताचा वापर करावा. वरील पद्धत अवलंबल्यास एकरी सरासरी चांगले उत्फा घेता येऊ शकते.

दरम्यान, संदीप सांगळे यांचे शेतीमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमांत संतोष बोत्रे, अजित शेळके, अमित ताकवणे, ईश्वर ताकवणे, सुनील ताकवणे, विकास कुदळे, संतोष कुल, शरद शिंदे, नाना वडघुले, मनोहर गरदरे, भरत लोले, मच्छिंद्र लोले, राजाराम शितोळे, चंद्रहार देवकर, भानुदास गायकवाड, किरण गवारे, शिवाजी काटे, पांडुरंग लोणकर, विनोद मोरे व कौस्तुभ भागवत यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मच्छिंद्र ताकवणे, चैत्राली काळे, भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, कृषी सहाय्यक अजित फराटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here