सोलापूर : येथील लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या येणाऱ्या २०२५-२०२६ गळित हंगामासाठीच्या मिल रोलरचे पूजन कारखाना स्थळावरील मशिनरी विभागात करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील उपस्थित होते.
विक्रांत पाटील म्हणाले, शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामुहिक प्रयत्नातून कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास, हेच लक्ष ठेवण्यात आले आहे. मिल रोलरची विधिवत पूजा मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी व कामगार वर्ग उपस्थित होते.