कोल्हापूर : साखर उद्योगापुढे ऊस उत्पादन वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतकऱ्यांसह कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष करंजे यांनी केले. ‘एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील ऊस शेती’ याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भोगावती साखर कारखान्याच्या वतीने आमदार पी. एन. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर एआय तंत्रज्ञानाच्या कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णू पाटील होते.
डॉ. करंजे म्हणाले, ‘उसाची पळवापळवी करून कारखाने फार दिवस चालणार नाहीत. आता उसाचे अधिकाधिक उत्पादन घेणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सदाशिवराव चरापले, वसंतराव पाटील आदी उपस्थित होते. एस. बी. चरापले यांनी सूत्रसंचालन केले.