उसाच्या लागण पिकापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्वहंगाम आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुरा येतो. तर एप्रिल ते जून या काळात लागण केलेला ऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये तीन ते चार कांड्यावर असेल आणि तुरा येण्यास अनुकूल हवामान मिळाल्यास डिसेंबरपर्यंत तुरा येऊ शकतो. ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये उगवण किंवा फुटवा अवस्था असेल तर त्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये तुरा येत नाही असे कृषी तज्ज्ञ डॉ. कैलास भोईटे आणि डॉ. राजेंद्र भिलारे यांनी सांगितले.
याबाबत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. हंगामानुसार योग्य वेळी उसाची लागवड करणे आवश्यक आहे. ज्या वर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते त्याच वीं तुरा येण्याचे प्रमाण अधिक आढळून येते. महाराष्ट्रातील हवामानात उसाच्या वाढीवरील अर्गाकुर जुलै महित्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरुवात होऊन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात फुलकळीचे रूपांतर तुऱ्यात होते. दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पाऊस होतो, त्या वर्षी तुऱ्याचे प्रमाण अधिक असते. पाणथळ जमिनीत तुरा अधिक प्रमाणात येतो. ९९००४ या जातीस उशिरा तुरा येतो, परंतु पाणथळ जमिनीत लवकर तुरा येतो. सुक्रोजचे प्रमाण देखील घटते. तुरा येऊ नये म्हणून शास्त्रीयदृष्ट्या अशी कोणतीही उपाययोजना नाही. प्रायोगिकदृष्टया जमिनीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, हंगामानुसार योग्य वेळी उसाची लागवड करणे, जुलै व ऑगस्ट महिन्यात नत्र खताचा वापर या उपाययोजना केल्यास उसाला तुरा कमी प्रमाणात येतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.