अहिल्यानगर : मी राजकीय हिशेब चुकता करणारा माणूस आहे. मागील विधानसभा निवडणुकीत गणेश कारखान्याच्या संचालक मंडळ आणि कामगारांनी विरोधात प्रचार केला. भाजपसाठी काम करण्याऐवजी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मदत केली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. मतदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तरीही ‘गणेश’ कारखान्याकडे लक्ष द्यायचे नाही, असे आम्ही ठरविले आहे, अशी टीका विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. खडकेवाके येथे निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी नाव न घेता संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांच्यावर टीका केली.
अध्यक्ष डॉ. विखे पाटील म्हणाले की, गणेश कारखाना चालविण्यासाठी प्रवरा कारखान्याने शंभर कोटी रुपये कर्जाचा बोजा उचलला. कामगारांची रोजीरोटी सुरू राहिली. तेच कामगार आणि संचालक मंडळ गेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या विरोधात प्रचार करण्यात सक्रिय होते. योग्य वेळी योग्य तो हिशेब पूर्ण करू. खडकेवाकेचे माजी सरपंच सचिन मुरादे यांचे भाषण झाले. सरपंच संगीता सचिन मुरादे, माजी सरपंच सचिन मुरादे, रावसाहेब लावरे, पोलिस पाटील, जालिंदर मुरादे, राजेंद्र मुरादे, दीपक गायकवाड, बाबासाहेब मुरादे, रवींद्र सुरासे, सोमनाथ मुखमुल, सुदामा, मनीषा लावरे, राजेंद्र मुरादे, शिवाजी मुरादे, सुभाष यादव, रावसाहेब यादव, जालिंदर मुरादे, नरेंद्र मुरादे, नवनाथ मुजमुले, संदीप लावरे, प्रवीण मुरादे, आर. टी. लावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.