मुंबई: भारतात विक्री न झालेली साखर पडून असल्यामुळे सरकारने साखर कारखान्यांची अर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर जोर दिला आहेे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील कारखान्यांच्या परिसरात इथेनॉल इंधन पंप स्थापित व्हावेत असा प्रस्ताव नुकताच दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघटनेने सांगितले की, इथे मागणी झाल्यास इथेनॉल उत्पादित करणारे साखर कारखाने तयार केलेलं इथेनॉल थेट ग्राहकांना विकू शकतात.
टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील पहिली इथेनॉल मोटरसायकल सुरू केली. पहिल्या टप्प्यात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडु आणि कर्नाटक यासारख्या उस उत्पादक राज्यांमध्ये इथेनॉल तयार करणे सुरू केले जाईल. 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याच्या दृष्टीनें केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यास प्रोत्साहन द्यावे अशी मागणी केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.












