शेअर बाजारात तेजी : सेन्सेक्स ६७८ अंकांनी वधारला, निफ्टी २४,९५० च्या जवळ पोहोचला

मुंबई : मध्य पूर्व भू-राजकीय तणाव वाढत असतानाही, १६ जून रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक मजबूत पातळीवर बंद झाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ६७७.५५ अंकांनी वधारून ८१,७९६.१५ वर बंद झाला, तर निफ्टी २२७.९० अंकांनी वधारून २४,९४६.५० वर बंद झाला.

निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी लाईफ, ओएनजीसी यांचा समावेश आहे, तर टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, अदानी पोर्ट्स आणि सन फार्मामध्ये घसरण पहायला मिळाली. शुक्रवारी ८६.०९ च्या बंदच्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया ८६.०६ प्रति डॉलरवर किंचित वाढला.शुक्रवारी सेन्सेक्स ५७३.३८ अंकांनी घसरून ८१,११८.६० वर तर निफ्टी १६९.६० अंकांनी घसरून २४,७१८.६० वर बंद झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here