सांगली : केंद्राने उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (FRP) प्रतिक्विंटल ३४० रुपयांवरून ३५५ रुपये केला आहे. निर्णयामुळे शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळणार आहे. ०१९ पासून साखरेचा दर प्रतिक्विंटल ३ हजार १०० रुपये आहे. साखरेची किमान विक्री किंमत (MSP), इथेनॉलच्या किमतीत प्रमाणबद्ध वाढ करण्याची आहे. कारण, साखर कारखान्यांना साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न, वाढत्या एफआरपीची जुळणी करताना कसरत करावी लागत आहे, असे प्रतिपादन ‘विश्वास’ चे अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५- २६ साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम त्यांच्या व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष नाईक म्हणाले की, सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने टिकवण्यासाठी केंद्राने तातडीने साखरेची किमान विक्री किमतीत वाढ करणे गरजेचे आहे. यंदा कारखान्याने साडेसात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मिल प्रमुख अशोक पोवार यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते रोलरचे पूजन झाले. संचालक विराज नाईक, सुरेश पाटील, विश्वास कदम, शिवाजी पाटील, संदीप तडाखे, कार्यकारी संचालक अमोल पाटील, विजयराव नलवडे, बाळासाहेब पाटील, बाबासो पाटील यु. जे. पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील आदींसह खातेप्रमुख, सभासद आदी उपस्थित होते.