सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना भारतीय शुगर (कोल्हापूर) यांचा सन २०२४-२५ चा बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय शुगरतर्फे या पुरस्काराचे वितरण १८ जुलै रोजी महासैनिक दरबार (कोल्हापूर) येथे होणार आहे. गौरवचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शरद कदम यांना यापूर्वी राज्य पातळीवरील भारतीय शुगर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचा बेस्ट मॅनेजिंग डायरेक्टर, तसेच व्यंकटेश्वरा प्रकाशनचा सक्षम अधिकारी आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते गेली २५ वर्षे सोनहिरा कारखान्यात कार्यकारी संचालक पदावर काम करीत शरद कदम आहेत. यापूर्वी त्यांनी आंबेजोगाई, तासगाव, विश्वास आदी साखर कारखान्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी साखर उद्योगात केलेल्या कामाची दखल घेऊन भारतीय शुगर यांनी त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये सोनहिरा साखर कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील २६ पुरस्कार मिळाले आहेत.