इस्लामपूर : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे प्रतिवर्षी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. व्हीएसआयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे ३५ शेतकरी रवाना झाले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने निवडक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली.
शिबिरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होत असतात. संचालक जितेंद्र पाटील, विलास भंडारे, मनोज पाटील यांनी सहभागी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सचिव सिद्धेश्वर शीलवंत, दादासाहेब शेळके, पंकज पाटील, संदीप भोसले, जयवंत शिंदे, डॉ. हर्षल निकम, संजय नलवडे, डॉ. विजय कुंभार, अजय दुपटे, शिवाजी बाबर उपस्थित होते.