भुईंज : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन खासदार पाटील व त्यांच्या पत्नी प्रतिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशीला जाधव आदी उपस्थित होते. मागील व्यवस्थापनाच्या कार्यकाळात कारखान्याची प्रतिमा मलिन झाली होती; परंतु तीन वर्षांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर आम्ही कारखान्याची विस्कटलेली घडी बसवून इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना उसाला दर देण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी केले.
खासदार पाटील म्हणाले की, कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात किसन वीर कारखान्याने ८ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे. आगामी तीन हंगामांचे गाळप पूर्ण क्षमतेने झाल्यास शेतकरी व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. कारखान्याची सूत्रे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाकडे आहेत. मंत्री पाटील यांच्या प्रयत्नामुळे एनसीडीसीकडून दोन कारखान्यांसाठी ४६७ कोटींची रक्कम मिळाली होती. ही रक्कम फक्त कारखान्यावरील कर्ज भागवण्यासाठी वापरली. मागील तीन वर्षांमध्ये एकाही बँकेचे अर्थसाहाय्य न घेता आमच्या व्यवस्थापनाने इतर कारखान्यांप्रमाणे दर देत शेतकऱ्यांची व इतर देणी दिली आहेत. यावेळी जितेंद्र रणवरे, राजेंद्र तांबे, दत्तानाना ढमाळ, उत्तम पाटील, बाळासाहेब सोळसकर, रामभाऊ लेंभे, महादेव मस्कर, आत्माराम सोनावणे, मनीष भंडारी, अरविंद कदम, बबनराव साबळे, मानसिंगराव साबळे आदी उपस्थित होते.