अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात आगामी सन २०२५-२६ साठीच्या गळीत हंगामाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक प्रशांत घुले यांच्या हस्ते रविवारी मिल रोलर पूजन मोठ्या उत्साहात झाले. कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती ॲडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मिल रोलर पूजन कार्यक्रमाला उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, संचालिका वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर शुगर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कारखान्यात शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा, यासाठी गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.