कोल्हापूर : वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.कारखान्याने येत्या गळीत हंगामाकरिता ८२०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पूर्ण केली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात ४ लाख मे. टन ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ३० सप्टेंबरपूर्वी दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये कारखाना गळितासाठी सज्ज ठेवणार
आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष देसाई यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगामाकरिता ओव्हर होलिंगचे काम गतीने सुरू केले आहे. या हंगामासाठी सक्षम ३७५ परजिल्ह्यातील व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेस पहिल्या अॅडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापनामार्फत पूर्ण केले आहे. यावेळी उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे, अनिल फडके, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरकुटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, काशिनाथ तेली आदी उपस्थित होते.